पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अमोल इंगवले
नवी मुंबई : सिडकोच्या मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर महापालिकेने भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट बांधले. राजकीय दबावामुळे स्वत:चे अनधिकृत मार्केट स्वत:च पाडण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली. ८ जुन रोजी महापालिकेने मार्केट पाडले , परंतु डेब्रिज तसेच ठेवले. नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी व पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी डेब्रिज हटविण्यासाठी २५ दिवसात सादर केलेली तीन तक्रारपत्रे, विभाग अधिकारी कार्यालय व महापालिका मुख्यालय यादरम्यान संबंधित अधिकार्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेवून समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने गुरूवार, दि. ६ जुलैपासून डेब्रिज हटविण्यास सुरूवात केली आहे.
८ जुन रोजी महापालिका प्रशासनाने मार्केट पाडले खरे, पण मार्केटचे पत्रे हनुमान मंदिरासमोरील प्रागंणात तसेच ठेवले. डेब्रिज व रॅबिट तसेच विखुरलेले होते. मार्केटच्या लोखंडी सळ्या पदपथावर लोंबकळत होत्या. या डेब्रिजमुळे परिसराला बकालपणा आला होता. पावसाळ्याच्या दिवसात या डेब्रिजमुळे साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती होती. यामुळे सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांनी लगतच्या उद्यानात मॉर्निग वाक साठी येणार्या पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर स्थानिक रहीवाशांच्या जनभावना लक्षात घेवून खांडगेपाटील यांनी डेब्रिज हटविण्यासाठी २१ जुन, २६ जुन आणि २ जुलै रोजी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारपत्र सादर केली. या समस्येवर सर्वप्रथम नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबसाईटने प्रकाशझोत टाकताना २१ जुन व २८ जुन रोजी समस्येच्या बातम्याही प्रकाशित झाल्या.
अनधिकृत मार्केटच्या डेब्रिजमुळे निर्माण झालेली समस्या व स्थानिक रहीवाशांच्या जिवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेवून पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका विभाग अधिकारी कार्यालय व महापालिका मुख्यालयात सात ते आठ वेळा हेलपाटे मारत संबंधितांच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून दिले. अतिक्रमण विभागाने मार्केट पाडणे आमचे काम असून डेब्रिज उचलणे नाही असे सांगत डेब्रिजबाबतची जबाबदारी झटकली. यानंतर हे घनकचरा विभागाचे काम आहे असे त्यांनी सांगितल्यावर घनकचराकडे खांडगेपाटील यांनी पाठपुरावा केला.
तक्रारपत्रातून व प्रत्यक्ष भेटीतून पत्रकार खांडगेपाटील यांचा सुरू असलेला पाठपुरावा सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्थानिक रहीवाशांनाही समजला होता. ५ जुलै रोजी महापालिका प्रशासनाने डेब्रिज हटविण्यास सुरूवात केली.
०००
महापालिका प्रशासनाचे आभार – संदीप खांडगेपाटील
या कामाचे श्रेय मिळावे म्हणून या कामाचा पाठपुरावा केला नाही. श्रेय लाटण्याचा कोणीही प्रयत्न करा. पण काम झाल्याचे समाधान आहे. महापालिका विभाग अधिकारी कार्यालय व महापालिका मुख्यालय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे. पदपथावर आलेल्या लोखंडी सळ्या, मैदानावर विखुरलेले पत्रे, डेब्रिज, सुरू असलेला पावसाळा, साथीच्या आजाराचे संकट, परिसराला आलेला बकालपणा आदी सर्व समस्यांचे गांभीर्य मी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यातून उशिरा का होईना पालिका प्रशासनाला जाग आली हे आमच्या नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांचे व सारसोळे ग्रामस्थांचे नशिब आहे. या समस्या निवारणासाठी केलेला पाठपुरावा हा प्रसिध्दीसाठी तर लोकांच्या समस्या निवारणासाठी केला होता. ही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केलेल्या सुजित शिंदे यांच्या नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाचेही आभार मानत असल्याची प्रतिक्रिया पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी यावेळी व्यक्त केली.