• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2018

घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. नाकाबंदीसाठी कार अडवली असता चालकाने कार सोडून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये १५८ किलो गांजा आढळून आला.
घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजमहेंद्र बाळतकर, सहायक निरीक्षक राहुल सोनवणे, नितीन पगार, तुकाराम निंबाळकर यांचे पथक तयार करण्यात आलेले. त्यानुसार सेक्टर ५ व इतर परिसरात सोमवारी पहाटे नाकाबंदी लावण्यात आलेली. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची चौकशी केली जात होती. याचदरम्यान सदर मार्गाने एक स्कोडा कार (एमएच ४३ ए १८२५) त्याठिकाणी आली. परंतु पोलिसांना पाहताच कारमधील व्यक्तींनी कार जागीच सोडून अंधारात पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून देखील ते हाती लागले नाहीत. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी ते सोडून गेलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह हा गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, तो १५८ किलो होता. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी सांगितले. परंतु कार मालक तसेच गांजा घेवून त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. तर या प्रकारावरून रात्रीच्या वेळी महागड्या गाड्यांमधून त्याची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. हा गांजा झोपड्यांमध्ये अथवा नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत विक्री केला जात असल्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमधून ही बाब समोर आलेली आहे. परंतु सातत्याने कारवाया करून देखील गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नसल्याने शहरातली तरुणाई नशेच्या आहारी जात चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर या गांजाची विक्री होत आहे. तर एपीएमसी, तुर्भेसह अनेक ठिकाणी गांजाची शेती यापूर्वी आढळलेली आहे. परंतु गांजा पुरवणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नाही

Previous Post

मराठा आंदोलनातून नवी मुंबईला वगळले

Next Post

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची मनोज मेहेर यांची मागणी

Next Post
‘मल:निस्सारणची झाकणे दाखवा अन्यथा पोलिसांमध्ये झाकणे चोरीचा गुन्हा दाखल करणार’

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची मनोज मेहेर यांची मागणी

गणेशोत्सवाकरिता कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेर यांची मागणी

गणेशोत्सवाकरिता कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेर यांची मागणी

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com