लोकनेते गणेश नाईकांनी केली नगरसेवक गिरीश म्हात्रेंच्या कामाची प्रशंसा
नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते सोमवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी नेरूळमध्ये महानगर गॅसच्या मुख्य वाहिनीच्या कामाचा शुभारंभ झाला. नेरूळ गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या पुढाकारातून ही समस्या मार्गी लागली असून स्थानिक रहीवाशांना थेट घरगुती गॅसची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नेरूळ सेक्टर २० येथील शिवशंभो मित्र मंडळ चौक, डी ब्लॉक व प्लॅट ओनर्स असोसिएशनच्या मंडपाजवळ सांयकाळी ६ वाजता येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महापौर जयवंत सुतार, ठाण्याचे माजी खासदार व नवी मुंबईचे प्रथम महापौर डॉ. संजीव नाईक, महापालिका सभागृह नेता रविंद्र इथापे, नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकुर, नेरुळ गावचे माजी सरपंच के. एन. म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, आरेकरसर, राजेश भोर, विकास पालकर, बलविंदर सिंघ, गणेश ठाकूर, दीपक परब, वॉर्ड अध्यक्ष गणपतबुवा भोपी, अक्षय पाटील, देवनाथ म्हात्रे, संदेश गायकवाड, जयंत म्हात्रे प्रितेश पाटील फ्लॅट ऑनर्स असोसिएशन, शिवशंभो मित्र मंडळ व सी व डी , ए व बी ब्लॉकचे सोसायटी पदाधिकारी व रहिवासी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नेरूळ सेक्टर २० मधील सी ब्लॉक व डी ब्लॉक येथे महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यात येणार असून उर्वरित ए ब्लॉक व सी ब्लॉक येथे हे काम प्रस्तावित असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी दिली. प्रभागातील रहीवाशांना आता गॅस नोंदणी करणे, गॅसवाला कधी येणार याची प्रतिक्षा करणे यातून सुटका होणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक व स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. नगरसेवक गिरीश म्हात्रे प्रभागातील विकासकामांकरिता करत असलेल्या परिश्रमाची लोकनेते गणेश नाईक यांनी प्रशंसा केली.