
अक्षय काळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा प्रभाग ७६ मध्ये भाजपकडून शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे युवा नेते पांडूरंग आमले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रभाग क्रमांक ७६ मध्ये पांडूरंग आमले यांनी निसर्ग प्रेमी फाऊंडेशन, ज्येष्ठ नागरीक सिध्दीविनायक – वृक्षप्रेमी समुह, सानपाडा गार्डन कट्टा यांच्या सहकार्याने स्थानिक भागात वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ७० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपाचे नवी मुंबई उपाध्यक्ष जगन्नाथ (आबा) जगताप, ज्येष्ठ नागरिक नागरीक सिध्दीविनायक वृक्षप्रेमी समुह पदाधिकारी तनपुरे, गभाले, बाळासाहेब दौंडकर, सानपाडा गार्डन कट्टा पदाधिकारी नाना शिंदे, अधिकराव पवार, यादव,
सानपाडा मंडळातील भाजप पदाधिकारी रमेश शेटे (तालुका सरचिटणिस), आज्ञा गव्हाणे (महीला मोर्चा अध्यक्षा), भारती मोरे (जिल्हा सचिव), निता आग्रें (महिला मोर्चा), पंकज दळवी (तालुका उपाध्यक्ष), दिपीका बामणे (महीला युवा मोर्चा जिल्हा सचिव),
सुधीर आंग्रे, सुरेश पडवळ, शुभम आमले, नवरत्न सोसायटीचे घोगरे, श्रीकांत पांचाळ, अशोक भोगले (सचिव नवरत्न सोसायटी), अविनाश थोरात (खजिनदार), प्रदिप सुर्वे (सदस्य, नवरत्न सोसायटी),निसर्ग प्रेमी फाऊंडेशनचे सल्लागार आबा रणावरे उपस्थित होते.