संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
कोरोना महामारीच्या कठीण काळात विभागातील नागरिकांची यंदाची दिवाळी सुखाची व गोड करण्यासाठी शिवसेना नवी मुंबई व विजय नाहटा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते एक आपुलकीचा हात हे अभियान सध्या नवी मुंबईत राबविले जात आहे. विभागातील गरजू कुटुंबाना दिवाळी फराळासाठी एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो बेसन, एक किलो साखर, अर्धा किलो पोहे व उटणे या साहित्याचे वाटप नेरुळ सेक्टर ४८ शिवसेना शाखा येथे शिवसेना शाखाप्रमुख विशाल चंद्रकांत विचारे यांच्या वतीने करण्यात आले.
त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख सुमित्र कडू, महिला उपशहरप्रमुख सौं. जोसना मढवी आदी पदाधिकारी शिवसैनिक, महिला आघाडी व विभागातील नागरिक उपस्थित होते.