गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा भाजप प्रभाग ३० व समाजसेवक पांडुरंग आमले आयोजित सोन्याची दहीहंडी या उत्सवात मानाची सोन्याची दहीहंडी माझगावच्या ‘संघर्ष’ गोविंदा पथकाने फोडली. या उत्सवात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल-उरण भागातील अनेक दहीहंडी पथकांनी भाग घेतला होता.
सानपाडा सेक्टर ८ मधील हुतात्मा बाबु गेनू मैदानावर गेल्या तीन वर्षांपासून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थक, निष्ठावंत अनुयायी तसेच मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडुरंग आमले दहीहंडी उत्सवाचे व्यापक प्रमाणावर आयोजन करत आहेत. सानपाडा येथील साईभक्त सेवा मंडळ आयोजित भव्य सोन्याची दहीहंडी – २०२३ उत्सव मोठ्या उत्साहात गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजक साई भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सोन्याची दहीहंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जल्लोषात साजरी केली. या दरम्यान साईभक्त महिला फाउंडेशनच्या महिला सदस्यांसाठी हंडी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते एकूण १३ स्पर्धकांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला होता. हंडी सजावट स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन नंबर देण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेले प्रमुख मान्यवर बेलापूर मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे आणि नवी मुंबई भाजपचे महामंत्री निलेश म्हात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ‘ गोविंदा रे गोपाळा ’ या कृष्णाच्या पारंपारिक गाण्याने सर्व प्रेक्षक वर्गाला उत्साहाची ऊर्जा दिली. आर नाईक इव्हेंटच्या काही कलाकारांचे नृत्य सादरीकरण गोविंदा प्रेमींना पाहायला मिळाले.
नवी मुंबईतील नावाजलेला प्रसिद्ध लावणी सम्राट अशिमिक कामठे याच्या लावणीची झलकही प्रेक्षकांना पहायला मिळाली आणि या बहारदार कार्यक्रमाचा सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला. याबरोबरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध स्तुत्य उपक्रम राबवून समाजाला एक सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. यावर्षीच्या मानाच्या सोन्याच्या दहीहंडीचा मान माझगावचे ‘ संघर्ष गोविंदा पथक ‘ यांनी पटकावला आणि उपविजेता म्हणून ‘ ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक ‘ तसेच ‘कोळी बॉईज घणसोली पथक ‘यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला साईभक्त सेवा मंडळ आणि साईभक्त महिला फाउंडेशन मधील सर्व सदस्यांचे कार्यक्रम उत्तमरीत्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.