स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली असून त्यांनी गुरुवारी सकाळी आयुक्तपदाची धुरा स्वीकारली. त्यांना महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच कामगार नेते रविंद्र सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे वाहन चालक युनिट अध्यक्ष राजन सुतार , उपाध्यक्ष कृष्णा घनवट , स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे ,राजेंद्र देशमुख , दिनेश वागुलदे , जयेश पाटील , मिलिंद तांडेल , राजेंद्र जाधव , प्रशांत गमरे , नदीम पटेल उपस्थित होते.