सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजताच संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने रविवारी १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील सीबीडी येथील वारकरी भवनमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सीबीडी मधील गेली २५ वर्षापासूनची जुने कार्यकर्ते असून ते आजपर्यंत माझ्यासोबतच आहेत. त्यामुळे माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. तसेच भाजपा महायुती पक्ष कायमच विकासाचा मुद्दा घेऊनच राजकारणात काम करत आहे. त्यामुळे आम्ही विकास कामावरच बोलणार असं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रातील बेलापूर ते वाशी पर्यंत या विभागामध्ये माझ्या आमदार निधीमधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सुमारे २००० रुपये कोटी निधी उपलब्ध करून गावाठांसहित इतर विभागाचा हि कायापालट करून नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये झालेला विकास जनतेच्या डोळ्यासमोर उभे आहे.
सदर मेळाव्यात अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय होईल असा विश्वास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.