• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 5, 2025

परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसची तपासणी अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लेखी मागणी कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या तब्बल 7 बसेसच्या जळीतकांडाच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या बसेसमध्ये आग लागणे ही चिंताजनक बाब आहे. यामुळे परिवहन उपक्रमाचे वाहक-चालक तसेच प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. या घटनांमुळे प्रवासी परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणे टाळतील. मुळात परिवहनच्या बसेसमध्ये हजारो नवी मुंबईकरांची दररोज प्रवासी वाहतूक होत असल्याने त्या बसेस सुस्थितीत असणे आवश्यक आहे अथवा बसेस जळीत घटनांमुळे महापालिका प्रशासनाची प्रदेश पातळीवर प्रतिमा मलीन होऊन बसेसला मृत्यूचा सापळा म्हणून प्रवाशांकडून संबोधले जाईल. बस जळीतकांडाच्या घटना गंभीर बाब असून प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाकडून नादुरुस्त बसेस चालविल्या जात असून त्यामुळे अपघातही झाले आहेत. अनेक बसेस गळक्या असल्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नादुरुस्त बसेसमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? अपघातग्रस्त चालक व वाहक कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे पालनपोषण कोण करणार? त्यामुळे सर्वप्रथम नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणण्याचे प्रकार बंद करणे आवश्यक आहे. परिवहन उपक्रमाच्या कार्यरत असलेल्या सर्वच बसेसची तपासणी अथवा स्ट्रक्चरल ऑडिट होणेआवश्यक आहे. बसेस नादुरुस्त असतील तर दुरुस्ती व्हावी. वापरण्यायोग्य नसतील तर त्या बसेसची भंगारात रवानगी करावी. महापालिका सधन असून पालिका प्रशासनाला आवश्यकता असल्यास नवीन बसेसची खरेदी प्र्रशासन करु शकते. आपण तातडीने परिवहन उपक्रमाच्या सर्वच बसेसचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे व बस तपासण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. बस जळीत कांडाच्या घटना पुन्हा होणार नाहीत याबाबत आपण परिवहन उपक्रमला आद्ेश द्यावेत. बस जळीत घटना घडून काही दुर्घटना घडल्यास परिवहन व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

Previous Post

नेरूळच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जलवाहिनीची गळती थांबवा : संदीप खांडगेपाटील

Next Post

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीसाठीचा निर्णय

Next Post
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीसाठीचा निर्णय

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीसाठीचा निर्णय

वटपौर्णिमेनिमित्त नेरूळमध्ये वृक्षारोपण

वटपौर्णिमेनिमित्त नेरूळमध्ये वृक्षारोपण

जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक

जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com