• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 19, 2026

सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का?: सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का?: सचिन सावंत

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

मुंबई : काँग्रेस संसदीय दलच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडले व या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. शिंदेसेनेला सावरकरांचा अपममान झाला असे वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर यांनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तकात सावरकांचे हिंदुत्व नकारात्मक होते असे म्हणत त्यांचा ‘राष्ट्रद्रोही’ असा उल्लेख केला आहे. सावरकरांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हटलेले ‘बंच ऑफ थॉट्स’ हे पुस्तक शिंदेसेना फाडणार का? आणि संघ विचाराच्या सरकारमधून बाहेर पडणार का? असे प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सांवत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विचार खोक्यापासून सुरु होऊन खोक्यापर्यंत संपतो, त्यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचाराला उत्तर विचाराने द्यायचे असते याची माहिती नाही. ज्या पाच प्रवक्त्यांनी सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडले ते वेगवेगळ्या पक्षातून शिंदेसेनेत आलेले आहेत, त्यांना स्वतःचा विचारही नाही. सोनियाजी यांनी त्यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ वर सावरकर यांच्या बद्दल ओझरता उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी जे लिहिले ते ऐतिहासिक सत्य आहे. सोनियाजी गांधी यांची आजवरची राजकीय कारकीर्द ही गांधीजींच्या सत्य व अहिंसा या तत्वाशी निगडीत राहिलेली आहे. शिंदे सेनेच्या लोकांचा अभ्यास असता तर असा मुर्खपणा त्यांनी केला नसता. दुसरे असे की भाजपाचे नेते अरूण शौरी यांचे The New icon– Savarkar and the Facts, या पुस्तकातही हेच सत्य सांगितले आहे, त्यांचेही पुस्तक शिंदेसेना फाडणार आहे का? पुणे न्यायालयात राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर यांच्यातील सावरकर बदनामी खटल्यात, सावरकरांनी दहा वेळा माफीनामे दिले होते हे सात्यकी सावरकरांनी मान्य केले आहे. या साक्षित सात्यकी यांनी वीर उपाधीपासून माफीनामे, पेंशन, मुस्लीम लीग बरोबरच सरकार स्थापन करणे, गांधी हत्येच्या संदर्भातील संबंध यावरही भाष्य केलेले आहे, असेही सावंत म्हणाले.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखापेक्षा सावरकर यांचा भयंकर अपमान गोळवलकर यांनी केलेला आहे, अरूण शौरी यांच्या पुस्तकातही अपमान केलेला आहे असे असूनही एकनाथ शिंदे यांचा गट आज त्याच विचारसरणीच्या पक्षात सत्तेत मांडीला मांडू लावून बसलेला आहे. सावरकर यांची खरी अवहेलना उजव्या विचारधारेच्या लोकांकडूनच सुरु आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी असो अथवा त्यांच्या नावाने राजकारण, यातून सावरकरांचा अपमान हीच मंडळ करत आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

Previous Post

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com