• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2026

माथाडी, हमाल आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांत लवकरच सुधारणा

adminbyadmin
in मुंबई
0
माथाडी, हमाल आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांत लवकरच सुधारणा

नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

मुंबई : राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्रातील माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार तसेच खासगी सुरक्षा रक्षकांच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यामध्ये महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ या दोन महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने देशातील २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार संहिता तयार केल्या आहेत. यामध्ये वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज परिस्थिती संहिता २०२० यांचा समावेश आहे.

या संहितांमध्ये कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्याबरोबरच उद्योगांसाठी सुलभ प्रक्रिया निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. वेतन संहितेमध्ये किमान वेतन, वेतन देण्याची पद्धत, बोनस आणि समान वेतनासंबंधी तरतुदी आहेत. औद्योगिक संबंध संहितेत कामगार संघटना, औद्योगिक वाद आणि कामगार-नियोक्ता संबंधांचा समावेश आहे.

सामाजिक सुरक्षा संहितेद्वारे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय), ग्रॅच्युइटी आणि मातृत्व लाभ यांसारख्या सुविधांशी संबंधित तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर व्यावसायिक सुरक्षा संहितेत कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्य, कामाचे तास आणि कामगारांच्या कल्याणासंबंधी नियम निश्चित करण्यात आले आहेत.

मात्र, केंद्राच्या या चार कामगार संहितांमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाने स्वतंत्रपणे संमत केलेल्या माथाडी आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या राज्यस्तरीय कायद्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवीन कामगार संहितांमधील बदलांच्या अनुषंगाने राज्यातील या दोन्ही कायद्यांमध्ये आवश्यक शब्दरचना आणि तरतुदींचा समावेश करणे गरजेचे झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने दोन्ही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवीन कामगार संहितांशी राज्यातील संबंधित कायद्यांचा समन्वय साधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Previous Post

दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभाग १७ मध्ये जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com