सिडनी – जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या आणि गतविजेत्या सायना नेहवालचे शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
उपांत्यपूर्वफेरीत चीनच्या वँग शिक्सियानने तिचा पराभव केला. पाचव्या सीडेड वॅगने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व गाजवताना सायनला कामगिरी उंचावण्याची संधी दिली नाही.
21-15, 21-13 अशा सरळ गेममध्ये सायनावर वँगने विजय मिळवला. चीनी महिला बॅडमिंटनपटूना कडवी लढत देण्यासाठी सायना ओळखली जाते पण या सामन्यामध्ये सायनला तितका कडवा प्रतिकार करता आला नाही.
42 मिनिटात वँगने सायनावर विजय मिळवला. सायनाच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. गेल्यावर्षी सायनाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.