फलटण : फलटण तालुका पत्रकार संघाच्यावतीने अ. भा. मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार माजी आमदार कॉ . हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीदिनी प्रतिवर्षी देण्यात येत असलेले राज्य ,विभागीय , जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच यावर्षीपासून देण्यात येणार असलेला जिल्हास्तरीय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप चव्हाण यांनी दिली आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात उत्कृष्ट आणि प्रभावी काम करणार्या पत्रकारांना फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गेल्या ११ वर्षापासून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब फलटण राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सकाळ माध्यम समूहाचे संपादक उत्तम कांबळे यांना देण्यात येणार आहे. २५ हजार रुपये रोख. सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ , पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रगतशील शेतकरी स्व. दशरथराव साळुंखे (पाटील) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येत असलेला पुणे विभागीय आदर्श पत्रकार पुरस्कार कोल्हापूर येथील न्युजटेल वेब पोर्टलचे संपादक मुकुंद फडके यांना देण्यात येणार असून १० हजार रुपये रोख. सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ , पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माजी नगरसेवक उद्योजक स्व. सुभाषराव बाजीराव निंबाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येत असलेला जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दै. ऐक्य, कराड कार्यालयातील उपसंपादक आनंदा थोरात, ओंड ता. कराड यांना देण्यात येणार असून ५ हजार रुपये रोख. सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ , पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्व. ह.भ.प. राजाराम जिजाबा झांबरे , आसू , ता. फलटण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व्यक्तीला यावर्षीपासून देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डॉ . अविनाश पोळ, सातारा यांना देण्यात येणार असून ५ रुपये रोख. सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ , पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य, विभाग, जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार आणि सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे वितरण गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय , लक्ष्मीनगर , फलटण येथील शानदार सोहळ्यात महाराष्ट्र विधापारीषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर, श्रीमंत यशवंतराव अप्पासाहेब निंबाळकर उर्फ दादाराजे खर्डेकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कॉ. ज्ञानोबा घोणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, न्यू . फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे ( पाटील ) , स्वराज संस्था समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक निंबाळकर, सद्गुरू संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले आदि मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.