नवी मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र व शिवप्रबोधन सामाजिक संस्था,सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा, नवी मुंबई मधील अनाथ बालकांना व वृद्धांना फळ वाटप तसेच अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद पोखरकर,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, समाजसेवक योगेश हेळकर, गणेश रघुवीर, रोहित देशमुख, दिपक दळवी, विशाल बागल, उल्हास काळे, विशाल साबळे, अमित ढोमसे,जिल्हा सचिव हरेश जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका व लायन्स क्लब कोपरखैरणे विभागाच्या अध्यक्षा संध्या खांडारे, कोषाध्यक्षा निम्मी टंडन,उप कोषाध्यक्षा विजया निंबाळकर,पालक जयवंती कोरडे,रिर्झव्ह बँकेचे निवृत्त अधिकारी व वात्सल्य ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण नलावडे, भाविसेचे राजेश देशमुख, महेश बनकर, समाजसेवक श्रीराम मढवी, महिला आघाडी विभाग संघटक माधुरी बनकर,प्रियांका वाद्गाये प्रमुख म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे प्रदेश उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन चळवळ,महाराष्ट्रातील गड-किल्ले तसेच दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे सर व संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांनी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. तसेच बालकांनी वाढदिवसानिमित्त गीत गायन करून दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे सर यांना औक्षवंत होण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सह्याद्री प्रतिष्ठानकडून वात्सल्य ट्रस्ट या सेवाभावी संस्थेला यावेळी श्री. विनोद पोखरकर यांच्या सहकार्यातुन आर्थिक मदत करण्यात आली. तसेच श्री. योगेश हेळकर यांच्या सहकार्यातुन सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या माध्यमातुन वात्सल्य ट्रस्ट, मुंबई या संस्थेला प्रत्येक महिन्यात ५० किलो गहु / तांदुळ / साखर इत्यादि अन्नदान स्वरुपात मदत केली जानार आहे.
सदर कार्यक्रमाच्या वेळी पालक जयवंती कोरडे यांनी अनाथ बालकांना कपडे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र व शिवप्रबोधन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अमन गोळे, कार्याध्यक्ष स्वप्निल भिलारे, उपाध्यक्ष श्रीकांत अतकरी, सहसचिव मयूर मुळे,खजिनदार सुबोध गडेकर, सदस्य साहिल डवले, आकाश पाटील, केतन गोळे, प्रतिक गोळे, समीर कोंढाळकर, निखिल यादव, स्वप्निल पवार, ओमकार पाचपुते या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.