नवी मुंबई : साथीच्या आजाराचा नवी मुंबई कार्यक्षेत्रात साथीच्या आजाराचा झालेला उद्रेक पाहता महापालिका प्रशासनाने नेरूळ, ऐरोली, बेलापुर येथील रूग्णालये सुरू करण्याची मागणी आरोग्य सभापती सौ. पुनम मिथुन पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्ल्यू व अन्य व्याधीने नागरिक हैराण झाले आहेत. सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी रूग्णालये, दवाखान्यात उपचार घेणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बनते. त्यामुळे बेलापुर, नेरूळ, ऐरोलीतील रूग्णालयाची माहिती मागवून किरकोळ कामे बाकी असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून नवी मुंबईकरांना आरोग्य सुविधा पुरविण्याकरता संबंधित रूग्णालये लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आरोग्य सभापती सौ. पूनम मिथुन पाटील यांनी केली आहे.
यावेळी आयुक्तांना निवेदन देताना आरोग्य सभापतींसमवेत इंटकचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मिथुन पाटील उपस्थित होते.