बीड: दुष्काळाच्या भीषणतेमुळे येथील गंगामसला गावाने सामुदायिकरीत्या आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी नसलेला चारा अशा भीषण परिस्थितीत मराठवाडा सापडला असून; येथील ग्रामस्थांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीडच्या गंगामसला गावात गेल्या अनेक वर्षापासून शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. गावच्या शिवाराजवळून गोदावरी नदी वाहत असली, तरी पाण्याअभावी नदीचे पात्र सुकले आहे.
त्यात ग्रामीण बँकेने कर्जासाठी हात आखडता घेतल्याने सामुदायिक आत्महत्येशिवाय ग्रामस्थांसमोर पर्याय राहिलेला नाही. कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या साडेसहा हजार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या ग्रामस्थांनी एकमुखी आत्महत्येचा ठराव केला आहे.