हैदराबाद : राज्यात कांदा खरेदीसाठी तब्बल चार किलोमीटर लांब पर्यंत नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. शिवाय, आधार कार्ड दाखविणार्यांनाच २० रुपये किलो दराने कांदा मिळत आहे.
राज्यामध्ये कांद्याचे दर कमालीचे वाढले आहेत. खासगी बाजारामध्ये ६० ते ८० रुपये एवढा कांद्याचा एक किलोचा दर आहे. यामुळे नागरिक सरकारी योजनेतून कांदा खरेदी करण्याकडे वळत आहे. सरकारी योजनेतील कांदा खरेदी करण्यासाठी तब्बल चार किलोमिटरच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. कांदा खरेदी करणार्यांसाठी सरकारने योजना आखली आहे. एका कुटुंबाला एका आठवड्याला २ किलो कांदा मिळेल. परंतु, त्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागत आहे.
सरकारने सुरू केलेली योजना खूप चांगली आहे. मात्र, त्यासाठी वाट पाहण्याबरोबरच तासन् तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे, असे भुवनेश्वरी या महिलेने म्हटले आहे.