नेरूळच्या राजीव गांधी उड्डाणपुलाखाली शिवसेनापुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर 2-8-10 या गणेशोत्सवातील ही आकर्षक गणेशमूर्ती. नवसाला पावणारा गणराया अशी या गणेशोत्सवाची ख्याती. दरवर्षी नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची या गणेशोत्सवाकरता मोठ्या संख्येने गर्दी असते. रस्त्यावरील गणेशोत्सव असल्याने यंदाचा गणेशोत्सव आयोजित करण्यापूर्वीच या मंडळाला विविध त्रासाचा, अडीअडचणींचा सामना करावा लागला. मंडळाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे मंडळाचे अध्यक्ष असून शिवसेनेचे नगरसेवक रंगनाथ औटी हे सचिव आहेत. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, शिवसेना विभागप्रमुख शिवाजी महाडीक, गणेश घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम करत आहेत. (छाया : संजय बोरकर)