सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 10 मध्ये साईबाबा हॉटेलनजीकच्या चौकात लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव हा समाजप्रबोधनावर भर देत असल्याने दरवर्षी भाविकांसाठी आकर्षणाचा व भक्तिभावाचा विषय ठरत असतो. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली गेली 28 वर्षे हा गणेशोत्सव साजरा केला जात असून नवी मुंबईतील गणेशोत्सवाच्या मांदीयाळीत समाजप्रबोधन व जनजागृतीवर भर देणारा गणेशोत्सव अशी या गणेशोत्सवाची ख्याती याचे सर्व श्रेय नगरसेवक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनाच जाते.
कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, भंजकपणा नाही. केवळ सद्य:स्थितीवर आधारीत विषय, लोकप्रबोधन आणि जनजागृती असा त्रिवेणी मेळ साधत दरवर्षी लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव साजरा करण्यावर नामदेव भगत आणि त्यांच्या सहकार्यांकडून भर दिला जात आहे. यंदाही लोकप्रबोधन व जनजागृती यालाच गणेशोत्सव समर्पित केला असून यावर्षी पावती व देणगीच्या स्वरूपात जमा होणारा निधी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तसेच परिसरातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वितरीत केला जाणार असल्याची माहिती नामदेव भगत यांनी दिली.
लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव हा पूर्णपणे नामदेव भगत यांच्या संकल्पनेखाली आयोजित करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षी न्यायालयीन आदेशाचे पालन करत गणेशोत्सवाची जागा थोडी बदलण्यात आली असून मुळ जागेपासून अवघ्या काही पावलाच्या अंतरावरच रिक्त जागेवर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवातील मंडपात प्रवेश करण्यापूर्वीच रस्त्यावरील खांबावरील फलकांवर नजर टाकल्यास लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सवातील नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखालील लोकप्रबोधनाचा व जनजागृतीचा प्रामाणिक उद्देश आपल्या निदर्शनास येतो. स्त्रीभ्रूण हत्या, कौंटूबिक वाद, बचत, रोजगार-स्वंयरोजगार, पाणी-वीजबचत, महाराष्ट्रातील ग्रामीण भाग यासह अनेक विषयांना चालना देण्यात आली आहे. मंडपात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम भाविकांचे लक्ष 11 फूट उंचीच्या व 30 फूट लांबीच्या भव्य फलकांकडे जाते. या फलकावरील आठ विषय आणि त्याअनुरूप लावण्यात आलेली छायाचित्रे भाविकांना विचार करावयास भाग पाडते. एका ठिकाणी बेलापुर किल्ल्याचा फोटो असून त्याखालील आम्हाला माफ कर. आम्हाला तुझे संवर्धन करता आले नाही, निगा घेता आली नाही हे वाक्य भावनेला हात घालणारे असून यातून नवी मुंबईकरांच्या एका अपराधी भूमिकेचे व प्रायश्चित मागणार्या वृत्तीचे दर्शन घडविते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अस्वच्छतेवर भर देण्यात आला असून याला जबाबदार कोण? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. नवी मुंबईतील नाट्यचळवळीचे केंद्र व सांस्कृतिक वारसा असणारे वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृह आणि स्थानिक आगरी-कोळी समुदायाच्या त्यागाचे व अस्तित्वाचे प्रतिक असणारे आगरी-कोळी भवन यांचेही एकत्रित छायाचित्र लावण्यात आले आहे. नवी मुंबईतील कंपन्या-कारखान्यांचे चित्र दाखवून बेरोजगारीच्या समस्येवर प्रकाशझोत टाकून स्वंयरोजगाराला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरकटलेली तरूणाई, पडणारे चुकीचे पाऊल तया पार्श्वभूमीवर बालमनावर घडणारे संस्कार महत्वाची भूमिका बजावतात यावर प्रकाशझोत टाकताना बालवयापासूनच बालकांवर भजन, किर्तन, हरिपाठ यांचा प्रभाव आवश्यक असल्याचे दाखविण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्या या ज्वलंत विषयावर नजर टाकताना कौसल्याव जिजामातेने प्रभू राम-शिवबा घडविलेे, पुन्हा यासह अनेक विषयांना हात घालत संवेदनशील मन जागृत करण्यासाठी विविध विषयांवर लोकप्रबोधन व जनजागृतीचा प्रयास लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती गणेशोत्सवाच्या माध्यमातून नगरसेवक नामदेव भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी केला आहे.
यंदाच्या वर्षी नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या गणेशोत्सवावर नजर मारली असता लोकप्रबोधन व जनजागृतीमध्ये लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव सर्वात आघाडीवर असल्याचे पहावयास मिळते. मंडपामध्ये प्रवेश करण्याअगोदर रस्त्यावरील असणार्या खांबाच्या फलकापासून, मंडपात प्रवेश केल्यावर फलकांवर नजर मारली असता, तसेच गणेश मंडपातील चलचित्रे पाहिले असता नामदेव भगत यांच्या एका संवेदनशील मनाचे प्रतिबिंब आपणास लोकप्रबोधन व जनजागृतीतून पहावयास मिळते. केवळ नेरूळवासियांमध्येच नाही तर नवी मुंबई शहरामध्ये आजमितीला लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सवाची लोकप्रबोधनामुळे व जनजागृतीमुळे गणेश भाविकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.