ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून पडणार्या जोरदार पावसाचा फटका अंबरनाथच्या एका शाळेला बसला आहे.
मोरिवली परिसरात असलेल्या अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ६ आणि १६ या प्राथमिक शाळेचा ४ थी चा वर्ग मुसळधार पावसाने कोसळला आहे.
सध्या गणेश उत्सवाच्या शाळेला सुट्ट्या असल्याने हा वर्ग बंद होता. त्यामुळे कोणतीही जीवित हानी न होता मोठा अनर्थ टाळला. अंबरनाथ मध्ये पावसाचा जोर कायम असल्याने शाळेच्या शेजारी असलेल्या नाल्यातील पाणी या वर्गात शिरल्याने हा वर्ग कोसळला आहे. उदया पासून गणेशोत्सवाच्य सुट्टी संपूण शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे चौथीच्या या विद्यार्थ्यना बसण्याची पर्यायी सोय पालिकेने अजुन तरी केलेली नाही.
या शाळेचे अनेक वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून जरजर झाले आहेत मात्र पालिका प्रशासन त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीच पावले उचलतांना दिसत नाही.