संजय बोरकर
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप म्हसणे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. सांयकाळी नेरूळ सेक्टर २ येथील सारसोळे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, प्रभाग ८५च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर, नवी मुंबई लाईव्हचे संपादक संदीप खांडगेपाटील, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, शिवसेना वाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले, प्रल्हाद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वार्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे व महादेव पवार, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र लगाडे, सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, भाविसेचे जयवंत माने, सामाजिक कार्यकर्ते संजय धोतरे, हरीहरन नाडार, इमरान नाईक यांच्यासह शिवम सोसायटीतील पदाधिकारी व रहीवाशी, शिवसाई उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशक्रिया विधी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी यावेळी श्रध्दाजंली वाहताना प्रताप म्हसणे यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला.