पुणे : सलग चार सुट्ट्या आल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असूनवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गुरूवार, २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद, शुक्रवारी २५ डिसेंबर नाताळ, चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने मुंबईकरांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे, कोकण आणि गोव्याकडे प्रस्थान केले आहे.
मुंबई- पुणे द्रुतगती व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांची गर्दी झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच खालापूर व कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत.