वॉशिंग्टन : व्हॉटस् अॅप वापरतानाही आता प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. व्हॉटस् अॅप वापरणार्याची वैयक्तिक माहिती काढून घेतली जाऊ शकते. एखादी लिंक्स् तुमच्या मित्राकडून आली आहे असे तुम्हाला वाटते; परंतु ती तुम्हाला डिस्काऊंट पेजवर नेते व तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते.नंतर तुम्हाला बनावट संकेतस्थळावर (वेबसाईट) नेले जाते, तेथे तुमच्या फोनला मालवेअरचा फटका बसतो व भानगड करणार्याला तुमची महत्त्वाची माहिती उपलब्ध होते. व्हॉटस् अॅपची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. सध्या त्याचा वापर जवळपास एक अब्ज लोक करीत आहेत म्हणूनच लबाड लोकांनी व्हॉटस् अॅपला आपले लक्ष्य केले आहे. इंटरनेट सिक्युरिटी आणि अँटिव्हायरस सॉफ्टवेअर सेवा देणार्या कॅस्परस्की लॅबचे मुख्य सुरक्षा संशोधक डेव्हिड एम. म्हणाले की, लबाड लोक फसवणुकीसाठी अनेक भाषांचा वापर करता 10 जणांना मॅसेज पाठवा; सवलतींचे आमिषव्हॉटस् अॅपवर येणारे मेसेजेस तुम्ही ते आणखी दहा जणांना पाठवा असे तुम्हाला सहज पटवते.त्यामुळे तुम्हाला काही सवलती मिळतात (उदा. स्टारबक व झारावर 5 पौंडांची सवलत) व्हॉटस् अॅपची लोकप्रियता ही युरोप आणि भारतात प्रचंड वाढत आहे म्हणूनच लबाड लोकांची नजर त्याकडे गेली.