एसबीआयने मुंबईतील किंगफिशर हाऊसचा १७ मार्चला लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या विविध शाखांमध्ये बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सवर ६९६३ कोटी रूपयांचं कर्ज आहे. यातील काही रूपयांची पुनर्प्राप्ती म्हणून किंगफिशर हाऊसचा लिलाव करण्यात येणार आहे.
एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेडने या संपत्तिला गेल्या काही वर्षांपासून आपल्या ताब्यात घेतले होते. ही संपत्ति २४०१.७० चौरस मीटर जागेवर आहे, १७ मार्चला या संपत्तिचा लिलाव करण्यात येईल. लिलावाची सुरूवात १५० कोटी रूपये किंमतीने होणार आहे.