मुंबई : कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेकडून शिवसेनेविरोधात फुकट वडापाव आंदोलन करण्यात आलं.
शिवसेना पदाधिकारी सुनिल महाडिकने फुकट वडापावसाठी दुकानदाराला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात फुकट वडापाव वाटून हे प्रतिकात्मक आंदोलन केलं.
दरम्यान, शिवसेना स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांतील संभाव्य बाचाबाची टाळण्यासाठी, तसंच प्रतिबांधत्मक कारवाई म्हणून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दादर टीटी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.