पुणे: देश-विदेशी पर्यटकांचं ‘विकेंड स्पॉट’ म्हणून परिचीत असलेली ऍम्बी व्हॅलीवरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. सहारा समुहानं १ कोटी रूपये भरल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
राज्य सरकारचा बिगर शेती कर थकवल्यानं मुळशी तहसीलदारांनी ऍम्बी व्हॅलीवर कारवाई करत रिसॉर्टला टाळं ठोकलं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून ऍम्बी व्हॅलीनं थकवलेल्या कराची रक्कम तब्बल ४ कोटी ८२ लाख इतकी आहे. याबाबत वारंवार नोटिसा देऊनही विकासकांकडून काहीच उत्तर न आल्यानं अखेर ऍम्बी व्हॅलीचं गेट सील करण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली होती.. मात्र आता १ कोटी भरल्यानं कारवाई थांबवण्यात आली आहे.