: वांद्रे पूर्व भागात शिवसैनिक आपापसात भिडल्याचे समोर आले आहे. वर्चस्वाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळते आहे. वांद्र्यातील ‘मातोश्री’ निवासस्थानाजवळ हा प्रकार घडला.शिवसेना शाखा क्रमांक ८९ चे शाखाप्रमुख बबन साळवी आणि श्रीकांत सरमळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. मारहाणीत शाखाप्रमुख बबन साळवी किरकोळ जखमी झाले आहेत.श्रीकांत सरमळकर यांचे समर्थक हरी शास्त्री यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शाखेतच हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.