चेन्नई, – आयआरएनएसएस – १ एफ मालिकेतील सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही-सी ३२ प्रक्षेपकाव्दारे हे प्रक्षेपण करण्यात आले.
आयआरएनएसएस मालिकेव्दारे भारत अमेरिकेच्या धर्तीवर स्वत:ची जीपीएस यंत्रणा विकसित करत आहे. आयआरएनएसएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे आहेत. भारताचा हा सहावा दिशादर्शक उपग्रह आहे.
उर्वरित तीन उपग्रहांमुळे आयआरएनएसएसचे काम अधिक अचूक आणि प्रभावी होणार असल्याचे इस्त्रोच्या अधिका-यांनी सांगितले.