नवी दिल्ली, – दिल्लीत यमुनेच्या तीरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही काहीही चूक केलेली नाही. आम्ही तुरुंगात जाऊ पण दंडाचा एक पैसाही भरणार नाही असे आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी गुरुवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेने यमुनेच्या तीरावर जागतिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवामुळे यमुनेतील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रीय हरीत लवादाने महोत्सवाला परवानगी देताना पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
हा महोस्तव सांस्कृतिक ऑलिंपिकसारखा आहे. अशा कार्यक्रमांचे कौतुक झाले पाहिजे असे रविशंकर म्हणाले. तीन दिवसाच्या या महोत्सवाला उद्यापासून ११ मार्चपासून सुरुवात होत असून, जवळपास दोन ते तीन लाख लोक या महोत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे.