सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कुकशेत गावातील भुखंडाचे करारनामाप्रकरणी कुकशेतचे ग्रामस्थ सोमवारी, (दि. २१ मार्च) दुपारी ३.१५ वाजता एमआयडीसीच्या महापे कार्यालयावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडकणार आहेत.
कुकशेत गावच्या भुखंड भाडेकरार पध्दतीने न करता कायमस्वरूपी करारनामे पध्दतीने करावेत याकरता कुकशेतचे ग्रामस्थ एमआयडीसी अधिकार्यांना निवेदन देणार आहेत.
एमआयडीसीकडून करारपध्दतीने भुखंड यावरून भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. आ. मंदा म्हात्रेंच्या माध्यमातून कुकशेतचे काही ग्रामस्थ कुकशेतच्या भुखंडांचे ९५ वर्षे भाडेकरार पध्दतीने करार करत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरज पाटील हे भाडेेकरार नाही तर कायमस्वरूपी मालकी याकरता ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन आज सादर करणार आहेत.