नवी मुंबई : छोट्या पडद्याच्या आणि विविध गॅझेटच्या या जमान्यात विविध कला जोषात लोकांसमोर येत आहेत. नवी मुंबईसारख्या वाढत्या शहरात नृत्याची ओढ वाढत आहे पण ही ओढ कुठेतरी एकपात्री अभिनयासंदर्भात वाढावी यासाठी अरुणोदय प्रतिष्ठान व साची प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळमध्ये प्रथमच एकपात्री स्पर्धा घेण्यात येत आहे.
जागतिक बाल व युवा रंगभूमीदिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या कला परंपरेमधील लोककला, जशा भारुड, किर्तन यासारख्या कला लोप पावत असताना, पु.ल.चा व लक्षुमन रावचा वारसा पुढे नेणारी एकपात्री अभिनय कला लोकांपर्यंत पोहोचावी हाच मुख्य हेतू या पाठी मागे आहे असे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेतर्फे मंदार गायधनी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा : ९००४५६७२६४ / ०२२ ६५५२२२०५.
एकपात्री अभिनय स्पर्धेकरता कोणत्याही विषयाचे बंधन नसून वयोगट १० ते १८ शालेय गट आणि १८ च्या पुढे खुला गट स्पर्धेकरता ठरविण्यात आला आहे. विघ्नहर्ता सामाजिक संस्थेच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २० मार्च रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ७ यादरम्यान ही स्पर्धा
छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदीर हॉल, सेक्टर ३, नेरुळ (पूर्व) या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती विघ्नहर्ता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश भंडारे यांनी दिली.