नवी मुंबई :सुजित शिंदे-९६१९१९७४४४ महानगरपालिका प्रशासनात काम करणार्या कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गिय व इतर मागासवर्गिय अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या वतीने मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांना लेखी निवेदन देवून भेटीची वेळ मागण्यात आली आहे.
विभागिय पदोन्नती समितीत मागासवर्गिय प्रतिनिधींची नियुक्ती करणे, मनपा प्रशासनात कार्यरत कनिष्ठ अभियंता यास शाखा अभियंता म्हणून नियमानुसार पदोन्नती देणे, आरोग्य सहाय्यक महिला यांच्या वेतनातील तफावत दूर करणे, सुर्यकांत जोमा विटावकर अधिक्षक वसूली अधिकारी यांना पदोन्नती देणे, उपस्वच्छता निरीक्षक- स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी- उपमुख्य स्वच्छता अधिकारी या पदांवर पदोन्नती देणे, स्टेनो या पदावरील १९ कर्मचार्यांना पदोन्नती मिळणे, प्रियांका काळसेकर, साहेबराव गायकवाड यांना उपआयुक्त म्हणून पदोन्नती देणे, आरसीएच करार कर्मचार्यांना मनपा आस्थापनेवर सामावून घेणे, मागासवर्गिय कक्षात डॉ. वैभव झुंजारे यांची सदस्यपदी नेमणूक करणे, कक्षसेवक पदावरून लिपिक या पदावर पदोन्नती देणे, प्रभाग वैद्यकीय अधिकारी या महासभेने मंजूर केलेल्या पदांवर सेवाज्येष्ठतेने वैद्यकीय अधिकार्यांना पदोन्नती देणे, वाहनचालक या प्रवर्गातून पदोन्नतीने अथवा नामनिर्देशनाने लिपिक पदावर नियुक्ती करणे अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार संघटनेने पालिका आयुक्तांकडे वेळ मागितला.
प्रलंबित समस्यांमुळे कामगार त्रस्त झाले असून आयुक्त सकारात्मक प्रतिसाद देवून समस्यांचे निवारण करतील असा आशावाद कामगार संघटनेचे मान सचिव रविंद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे.