नवी मुंबई :सुजित शिंदे-९६१९१९७४४४ बोर्डाने बारावीच्या परिक्षेचे हॉल तिकीट पाठवूनही कमी उपस्थितीचे कारण दाखवित कॉलेजने हॉल तिकीट न दिल्याने वाणिज्य शाखेच्या (कॉमर्स) १५ मुले बारावीची परिक्षा देवू शकली नाहीत. याप्रकरणी अभावपिच्या पदाधिकार्यांनी केलेला पाठपुरावा आणि शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी तातडीने केलेल्या हालचाली यामुळे नवी मुंबईतील त्या १५ विद्यार्थ्यांना जुनमध्ये बारावीची परिक्षा देणे शक्य होणार आहे.
नेरूळ सेक्टर १९ मध्ये र्स्टलिंग कॉलेज आहे. नुकत्याच झालेल्या बारावीच्या परिक्षेत या कॉलेजने १५ विद्यार्थ्यांनी कॉलेजात कमी उपस्थितीचे कारण दाखवित या मुलांचे बोर्डाकडून हॉलतिकीट येवूनही परिक्षेस बसू दिले नाही. संबंधित विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही दिले नाही. यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे हतबल झालेल्या पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवी मुंबई महाविद्यालयीन महामंत्री विनायक पिसाळ यांच्याशी संपर्क साधून घडला प्रकार कथन केला. पिसाळ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे घडला प्रकार कथन करत संबंधित मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू न देण्याचे साकडे घातले. पिसाळ यांनी संबंधित प्रकाराची शिक्षण विभागाच्या ओएसडी प्राची साठे यांच्याकडेही तक्रार केली.
शिक्षणमंत्री तावडे यांनी संबंधित १५ विद्यार्थ्यांना जुनमध्ये अन्य मुलांसमवेत बारावीची बोर्डाची परिक्षेस बसू द्यावे असे निर्देश बोर्डाला दिेले असल्याची माहिती प्राची साठे यांनी दिली. बारावीच्या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये याकरता यंदाच्या वर्षापासून जुनमध्ये त्या मुलांना पुन्हा परिक्षा देता येणार आहे. या मुलांसोबतच संबंधित १५ मुले बारावीची परिक्षा देणार असली तरी त्यांना गुणपत्रिका मात्र मार्चमध्ये परिक्षा दिलेल्या मुलांसारखीच देण्यात येणार आहे.
अभाविपचे पदाधिकारी विनायक मिसाळ, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण विभागाच्या ओएसडी प्राची साठे यांच्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचे समाधान संबंधित पालकांच्या चेहर्यावर पहावयास मिळत आहे.