– देवनार कचरा डेपोला आग लागून ४८ तास उलटले असून ही आग अजूनही आटोक्यात आली नाही. या आगीमुळे निघणार्या धुराचा त्रास शिवाजीनगर, गोवंडीमधील रहिवाशांना होत आहे. यात दमा, खोकला, डोळ्याची जळजळ असे त्रास जाणवू लागले आहेत. या आगीमुळे आज एका ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला.हसनैन खान असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून या बालकाला श्वसनाचा त्रास होत होता. त्याच्यावर चेंबूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या आगीच्या धुरामुळेच हा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.हसनैनच्या मृत्यूची माहिती मिळताच खासदार किरीट सोमय्या यांनी हसनैन याचे वडील सरफराज खणब्यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. शोकाकुल वातावरणात हसनैनचा अंत्यविधी करण्यात आला.