मुंबई : स्वतंत्र विदर्भ वा मराठवाडा ही संकल्पना मुळात श्रीहरी अणेंची नसून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.भाजप आणि संघ नेहमी अशी वक्तव्य दुसऱ्यांकडून वदवून घेऊन जनमताचा अंदाज घेत असतात. त्यामुळे हा अणेंच्या डोक्यात वळवणारा कीडा नाही, तर हा भाजपचाच आहे, असा घणाघात राज यांनी केला.मूळात श्रीहरी अणेंना महाराष्ट्र तोडण्याची भाषा करण्याची हिम्मत झालीच कशी? असा सवाल त्यांनी केला.“अणे हे नागपूरचे..मूळचे संघाचे..त्यांना राज्याच्या महाधिवक्तेपदी आणून बसवलं. त्यांची इच्छा नसताना त्यांना हे पद दिलं. त्यांनी आता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करून राजीनामा दिला. म्हणजे ते सुटले. पण त्यांनी सोडलेला कीडा, पिल्लू घेऊन, मराठवाड्यातील छोटे छोटे नेते उठून बसतील आणि त्यांच्या तोंडून हे वदवायला लावतील, हे भाजपचं जुनं धोरण आहे”, असं टीकास्त्र राज यांनी सोडलं.