सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्यामुळे जुईनगरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाकडून जास्त दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरूवात झाल्याने जुईनगर सेक्टर २४ मधील रहीवाशांची पाणी समस्या दूर झाली आहे.
कमी दाबाच्या पाण्यामुळे जुईनगर सेक्टर २४ मधील महालक्ष्मी व सिध्दीविनायक या दोन गृहनिर्माण सोसायटीमधील रहीवाशांना पाणीसमस्येचा सामना करावा लागत होता. रहीवाशांनी ही समस्या इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांना सांगितल्यावर त्यांनी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. कमी दाबाच्या पाण्यामुळे पाणीसमस्या होत असल्याचे लक्षात येताच संबंधित रहीवाशांना जास्त दाबाने पाणी देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने सावंत यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना जास्त दाबाने पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. रविंद्र सावंत यांच्या हस्ते जलवाहिन्या बदलण्याच्या कामास सोसायटीतील रहीवाशांनी सुरूवात केली. सोसायटीतील रहीवाशांकडून पाणीसमस्येचे निवारण केल्याबद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन करून रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.