नवी मुंबई महानगरपालिकेच्या 16 स्थायी समिती सदस्यांपैकी 1 मे 2016 रोजी माध्यान्ही निवृत्त होणा-या निम्म्या 8 सदस्यांची चिठ्ठ्यांव्दारे निवड महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 20 (3) अन्वये करण्यात आली.या अनुषंगाने श्री. सुरेश कुलकर्णी, श्री. रामचंद्र घरत, श्री. रविंद्र इथापे, श्री. शंकर मोरे, श्री. शशिकांत राऊत, श्रीम. कोमल वास्कर, श्रीम. रुपाली निशांत भगत आणि श्रीम. नेत्रा शिर्के हे 8 सदस्य स्थायी समितीतून निवृत्त होत असल्याची यादी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी सभापती श्रीम. नेत्रा आशिष शिर्के यांचेकडे सादर केली.