सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कुकशेतमध्ये सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून ५ मार्चपर्यत हा सप्ताह चालणार आहे.
ह.भ.प तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेतून गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सांयकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ८.३० संगीत भजन, रात्री ९ ते ११ किर्तन होणार आहे.
ह.भ.प काशिनाथ महाराज वेटा, ह.भ.प सखाराम महाराज पाटील, ह.भ.प सुरेश महाराज भोईर, ह.भ.प बळीराम महाराज नाईक, ह.भ.प तुळशीराम महाराज नाईक, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज केदार, ह.भ.प निलेशमहाराज शास्त्री यांची प्रवचने होणार असून ह.भ.प सांळुके महाराज,ह.भ.प सुनील महाराज रानकर,ह.भ.प पाडूंरंग महाराज आव्हाड, ह.भ.प गोडसे महाराज, ह.भ.प जाधवमहाराज पाटील, ह.भ.प राठोड महाराज,ह.भ.प भागवत महाराज यांची किर्तने होणार आहेत.
४ मार्च रोजी सांयकाळी ४ वाजता पालखी सोहळा आयोजन केले आहे. ५ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान ह.भ.प रमाकांत शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार असून सकाळी ११.३० नंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप केले जाणार आहे. नेरूळ सेक्टर १४ येथील भुखंड क्रं-पी-५, मराठी शाळेच्या जवळ हा हरिनाम सप्ताह सुरू असून किर्तन व प्रवचनामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.