मुंबई : ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे युवराज सिंहने ट्वेन्टी20 विश्वचषकातून माघार घेतली असून, त्याच्याऐवजी मनीष पांडेचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना युवराजचा घोटा दुखावला होता. टीम इंडिया मुंबईत दाखल झाली, तेव्हाही युवराज चालताना काहीसा लंगडत असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने आधीच मनीष पांडेला मुंबईत बोलावून घेतलं होतं. युवराजची दुखापत बरी न झाल्याने त्याचं वर्ल्डकप कॅम्पेन अखेर संपुष्टात आलं आहे.दुसरीकडे मनीष पांडेला पंधरा जणांच्या भारतीय संघात स्थान मिळालं असलं, तरी अंतिम अकरामध्ये कुणाचा समावेश होणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. युवराजऐवजी अजिंक्य रहाणे, मनीष पांडे आणि