‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या मुद्द्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळामध्ये आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. कायद्याने आमचे हात बांधले आहेत नाहीतर ‘भारत माता की जय’ न म्हणणार्यां लाखो लोकांची मुंडकी छाटली असती’, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोहतकमध्ये सदभावना सभेत ते बोलत होते.कोणी एक जण टोपी घालून उठून उभा राहतो आणि म्हणतो भारतमाता की जय नाही म्हणणार. हवं असेल तर माझा गळा कापा. या देशात कायदा आहे म्हणून, नाहीतर तुझ्या एकट्याचं का आम्ही तर लाखो लोकांचे मुंडकी आम्ही छाटू शकतो’, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.भारतमाता की जय म्हणणे आमच्या धर्माच्या विरोधी असल्याचं काही संस्था म्हणतात, त्यावेळी मला आश्चर्य वाटतं, असं सांगत आपल्या मातृभूमीचा गौरव करणं कोणत्याही धर्माच्याविरोधात नाही. तरीही जर कोणता धर्म असं म्हणत असेल तर तो धर्मच या देशाच्या हितामध्ये नाही, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भारत माता की जय बोलण्यास नकार देणार्यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं केलेल्या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला होता. मात्र माध्यमांनी सोयीस्कररित्या ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.