सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : स्व. मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्वनाथबुवा पाटील यांना संगीत क्षेत्रातील व्यक्तींकडून स्वरश्रध्दाजंलीच्या माध्यमातून श्रध्दाजंली वाहण्यात आली. रविवारी सांयकाळी स्वरश्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रविवार, 15 मे रोजी अभंगवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षामध्ये मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्वनाथबुवा पाटील यांनी आपले आयुष्यच संगीत क्षेत्राला समर्पित केले होते. त्यांनी विनामूल्यपणे सेवा करताना कोणताही मोबदला न घेता संगीत क्षेत्रामध्ये असंख्य विद्यार्थी निर्माण करत संगीताची खर्या अर्थाने साधना केली. नवी मुंबईसह रायगडपट्टी मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्वनाथबुवा पाटील यांच्या शिष्यांचे जाळे विखुरलेले आहे. गुरूवर्यांना स्वरश्रध्दांजलीच्याच माध्यमातून श्रध्दाजंली वाहण्यासाठी मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्वनाथबुवा पाटील यांच्या शिष्यवृंदाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये पं. श्री. शौनक अभिषेकी (पुणे) हे या अभंगवाणीत सहभागी झाले होते. सोबत त्यांना स्वप्निल भाटे (कल्याण), प्रदीप दिक्षित यांनी तबलावादनाला साथ दिली. सुंधाशु घारपुरे (कल्याण) यांनी संवादिनीला साथ दिली.
रविवारी, सांयकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यत नेरूळ सेक्टर 14 मधील कुकशेत गावातील ना.बा.पाटील शाळा क्रं 11 येथे हा स्वरश्रध्दाजंलीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमास नवी मुंबई भूषण रामभाऊ पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सुजाता सुरज पाटील, नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्यासह मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्वनाथबुवा पाटील यांचे नवी मुंबई व रायगडमधील शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.