नवी मुंबईः भाजपा-राष्ट्रवादीच्या मानापमानाच्या नाट्यात नवी मुंबई महापालिकायपरिवहन उपक्रम अर्थातयएनएमएमटीने खरेदी केलेल्या 2 हायब्रीड बसेस एनएमएमटीच्या तुर्भे येथील डेपोत डेरेदाखल झाल्या आहेत. तसेच एनएमएमटी व्यवस्थापनाद्वारे सदर हायब्रीड बसेस चालविण्याचे प्रशिक्षण 8 चालकांना दिले जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या या हायब्रीड बसेस जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी नवी मुंबईकर जनतेने केली आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वीडनचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हायब्रीड बसेसचे देशार्पण करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि ठाण्याचे आयुक्तदेखील उपस्थित होते. परंतु, मेक इन इंडियात पार पडलेल्या सदर कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक राज्यकर्त्यांना न दिल्याचे कारण पुढे करीत या कार्यक्रमास नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि परिवहन समिती सभापती साबू डॅनियल यांनी अनुपस्थित राहण्यात धन्यता मानली होती. त्यामुळे जनतेच्या पैशातून खरेदी करण्यात
आलेल्या हायब्रीड बसेसच्या उद्घाटनात राजकारण न आणता महापालिकेतील सत्ताधार्यांनी मानापमानात दंगयन राहता लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी जोर धरत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हायब्रीड बसचे उद्घाटन करण्याचा मानस नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. मात्र, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया कार्यक्रमात हायब्रीड बसेसचे उद्घाटन करण्यात आल्याने महापालिकेतील सत्ताधारी प्रशासनावर खट्टू झाले आहेत.
मात्र, जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून व्होल्वोने तयार केलेल्या 2 हायब्रीड बसेसचे लोकार्पण महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने लवकरात लवकर करावे. तसे झाल्यास संपूर्ण देशात हायब्रीड बसेस रस्त्यावर उतरविण्याचा पहिला मान नवी मुंबई महापालिकेला मिळणार आहे. शहरात वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदुषण कमी करुन पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या सदर हायब्रीड बसेसची खरेदी करण्यासाठी एनएमएमटीने व्होल्वोला सुमारे 2 कोटी रुपये दिले आहेत. एका हायब्रीड बसची किंमत अडीच कोटीच्या घरात आहे.