आमदार नरेंद्र पवारांच्या पाठपुराव्याला यश
उल्हासनदीतून मिळणार अतिरिक्त पाणी
कल्याण : प्रतिनिधी
भीषण दुष्काळाचे चटके विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शहरी भागाला देखील यावर्षी सहन करावे लागले. या भीषण दुष्काळाच्या दह्कातेने मुंबईसह कल्याण डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावी धरणाने तळ गाठला. यामुळे ओढवलेल्या पाणी संकटावर मात करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली महापालिकेचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असेल्या उल्ह्सनादीतून नेहमी पेक्षा अधिक ५० एमएलडी पाणी मिळाण्याबाबत विनंती केली होती. या प्रश्नी आमदार पवार यांनी केलेली विनंती मान्यकरीत वाढीव पाणी देण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधिताना दिले आहे. या वाढीव पाण्यामुळे काही अंशी तरी कल्याण डोंबिवली करांची तहान भागणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सहकार्यामुळे आमदार पवार यांनी त्यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणीबाणीची परिस्थिती आहे. वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे एरवी पावसाळ्यापर्यंत पाण्याचा मुबलक साठ देणारी धरणे कोरडी पडली आहेत. यामुळे ओढवलेल्या पाणी कपातीतून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र देखील सुटले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेची पाण्याची आवश्यक्ता ३६४ एमएलडी इतकी आहे. यामध्ये महापालिका आजवर काळू नदीतून ६० एमएलडी, महाराष्ट्र औदोगिक विकास महामंडळाकडून ३० एमएलडी आणि उल्हासनदीतून २५० पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाण्याच्या स्त्रोतापैकी काळू नदीच्या पाण्याच्या गुणावत्ता खालावल्यामुळे आणि पाणी पुरवठा योजना जीर्ण झाल्यामुळे येथील पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी यामुळे पाण्याच्या कपातीचे संकट कल्याण डोंबिवालीकारांवर आले होते. मात्र याबाबत भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन पाणी कपातीचे संकट काही अंशी कमी करण्यासाठी उल्हास नदीतून ५० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा करून देण्याची विनंती केली.
दरम्यान या मागणीचा सकारात्मक विचार करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त पाणी देण्याबाबतचे आदेश संबंधिताना दिले. यानुसार उल्हास नदीतून पहिल्या टप्यात महापालिकेने १० एमएलडी अधिक पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे.