नवी मुंबई : शिधावाटप विभागाच्या दक्षता समितीच्या सदस्यांची मासिक सभा आज दिनांक 30 मे रोजीसकाळी समितीचे उपाध्यक्ष आमदार संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शिधावाटपच्या वाशी
कार्यालयात पार पडली. समितीचे सचिव आणि शिधावाटप अधिकारी एस.आर.कोळी यावेळी उपस्थितहोते.30 एप्रिल 2016 रोजी दक्षता समितीच्या झालेल्या मागील मासिक सभेत आमदार नाईक यांनीशिधावाटप दुकानांमधील गहू आणि तांदळाचे नमूने घेण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले होते. गहू आणितांदळाचा दर्जा चांगला नसल्याबददल आमदार नाईक यांनी या बैठकीत नाराजी प्रगट केली होती.आजच्या बैठकीत या दोन्ही धान्याचे नमूने अधिकार्यांनी सादर केले असता ते चांगल्या प्रतीचे नसल्याचेआमदार नाईक यांना आढळून आले. सर्वसामान्य नागरिकांना शिधावाटप विभागातर्फे पुरविण्यात येणार्या जिवनावश्यक वस्तूंचा दर्जा चांगला असला पाहिजे असे सांगून आपण शिधावाटप धान्याचीगोदामे आणि शिधावाटप दुकानांना भेटी देवून चांगल्या दर्जाच्या धान्याचा पुरवठा नागरिकांना होतो आहे किंवा नाही? याची खात्री करुन घेणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली आहे.