नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेरुळ ९६/९७ च्या वतीने प्रभाग क्रमांक ९६/९७ मधील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी सायंकाळी ६ वाजता विद्याभवन शाळा सेक्टर-१८ नेरुळ येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात इयत्ता १२ वी मध्ये प्रभागातून ९०.८०% गुण मिळवून प्रथम आलेली कु सुनिधी सूरज ठाकूर, ९०.८०% गुण मिळवून द्वितीय आलेली कु बाजपेयी नेहा अनिलकुमार, ८८.५४% गुण मिळवून तृतीय आलेली कु मेस्त्री श्रुतिका सुभाष आणि इयत्ता दहावी मध्ये ९५% गुण मिळवून प्रथम आलेली कु. इंगवले ऋतुजा निवृत्ती, ९२.८०% गुण मिळवून द्वितीय आलेली कु काटकर श्वेता शरद , ९३.६०% गुण मिळवून तृतीय आलेला कु पिंजारी अनिरुद्ध धोंडीराम या सर्वांचा आणि त्यांच्या पालकांचा गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मेडल,वह्या आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उर्वरित विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नवी मुंबई महिलाध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, नगरसेविका जयश्री ठाकूर, नगरसेविका सुजाता पाटील व उपस्थित महिला, पुरुष, युवा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण २०० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,मेडल ,वह्या देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थी आणि उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजक तालुका अध्यक्ष गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ रुपाली किस्मत भगत आणि सर्व सहकार्यांचे आभार मानले.
गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी वर्गांनी भावी आयुष्यामध्ये आपली शैक्षणिक प्रगती करता करता एक चांगला माणूस म्हणून स्वतःची कशी रचना करायची व सामाजिक बांधिलकी कशी जपायची यावर मार्गदर्शन केले. येणार्या काळात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे प्रत्येक वार्डात शैक्षणिक उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशात त्यांचे आई वडील आणि त्यांचे शिक्षक यांचे योगदान फार मोठे आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या काळात जे यश मिळणार आहे. त्याचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी चांगल्या उद्देशाने करा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजनराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ (प.) तालुका अध्यक्ष गणेश भगत आणि प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी संयुक्तपणे केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता संजय पाथरे वार्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक -९७, अशोक गांडाल वार्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक -९६, पांडुरंग बेलापूरकर, सुरेश ठाकूर, प्रतिभा खंडागळे, प्राजक्ता प्रभू, सुरेखा देठे, राणी कासुर्डे, स्मिता पिंगळे, रुपाली म्हस्के, सागर मोहिते, संतोष दिघे, दीपक जाधव, चेतन खाडे, शिवाजी पिंगळे,शांताराम मातेले ,आनंद कदम , संजय सकपाळ ,एस पी गवस, शशिकांत विन्हेरकर, विष्णू देठे , मन्सूर कोतवडेकर, समाधान कांबळे, काशिनाथ डोके , बाजीराव धुमाळ, अमर मोरे, संगीता औटी, संग्राम चव्हाण, विकास तिकोने,अमर मोरे, संतोष पावसकर, शुभम काकडे, संदेश घाडी, राजेश घाडी, समीर परबलकर, स्वप्नील सुकाळे, कुणाल एडके, अविनाश तिकोने, निखिल चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.