चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना घराला दिसले कुलूप
-
मुंबई: प्रत्यूषा बॅनर्जीचे आत्महत्या प्रकरण जूने झाले असले तरी या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरुच आहे. या प्रकरणातील नवनवीन घडामोडी समोर येतच आहेत. बातमी आहे, की प्रत्यूषाचा बॉयफ्रेंड राहूल राज सिंह गायब आहे. राहूलच्या विरोधात पोलिसांनी 1011 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात पोलिसांनी प्रत्यूषाचा बॉयफ्रेंड राहूल राजवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या, धमकी दिल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप लावला आहे. कोर्टाने राहूलला 30 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता.
* कोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन…
– काही दिवसांपूर्वी राहूलने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून राहूल अनरीचेबल आहे.
– एका एंटरटेन्मेंट वेबसाइटवर छापलेल्या बातमीनुसार, कोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर राहूलचा फोन स्विच ऑफ आणि लोकेशनसुद्धा अनट्रेसेबल आहे.
– रिपोर्टमध्ये पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिस टीम राहूलच्या शोधासाठी त्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. राहूल राज सिंहसुध्दा तिथे नव्हता.
– व्हर्सोवा पोलिस स्टेशनचे सिनिअर इंस्पेक्टर किरण काळे यांच्या सांगण्यानुसार, जर राहूल राज सापडला तर त्याला लगेच अटक केली जाईल.
– ‘बालिका वधू’ फेम आनंदी अर्थातच प्रत्यूषा बॅनर्जी 1 एप्रिलला तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेली आढळली होती. राहूलने तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेले होते. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
– या प्रकरणात आतापर्यंत प्रत्यूषाचा बॉयफ्रेंड राहूल राज सिंहवर अनेकदा संयश घेण्यात आला आहे. परंतु राहूल त्याच्यावरील सर्व आरोप नाकारतो.