‘पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला आहे. मला कुरुक्षेत्र आणि त्यानंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढण्यास सांगण्यात आलं होतं. मी नकार देत माझ्या लोकांना धोका देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. जेव्हा मोदींची लाट आली तेव्हा विरोधकांना बुडवलं, सिद्दूला पण बुडवून टाकलं. हे पहिल्यांदा असंत तर मी सहन केलं असतं, पण ही चौथी वेळ आहे’, असा खुलासा यावेळी सिद्धू यांनी केला आहे.
‘लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत नाही. जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. जिथे पंजाबचं हित असेल तिथे मी उभा राहणार’, असंही सिद्धू बोलले आहेत.