डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा रविवारी संध्याकाळी पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना जाहीर भाषणात नाईक यांनी हे वक्तव्य केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मुद्द्यांवर बोलताना नाईक म्हणाले, २७ गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादी लढा उभारणार आहे. यावेळी २७ गावांच्या संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांनाही आपली मते व्यक्त केली.