त्यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे –
– देशाला अजूनही बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता लाभलेला नसल्याचे सांगत त्यांनी एकीकडे नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. मात्र, दुसरीकडे त्यांनी मोदी सगळे नीट करतील, असा आशावादही व्यक्त केला.
– माझा दिल्लीशी संवाद फारसा नव्हता, पण पूर्वी एक काळ असा नक्कीच होता की, मग अटलजी असोत, अडवाणीजी असोत, त्यांचा काही जरी विषय असला तरी शिवसेनाप्रमुखांशी अगत्याने चर्चा करीत. महाराष्ट्रात प्रमोद महाजन होते. ते जरी महाराष्ट्राचे होते, तरी देशात महत्त्वाची भूमिका पार पाडीतच होते. दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर गेले.
-गोपीनाथ मुंडे देशपातळीवर कुठे पोहोचतात न् पोहोचतात तोच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही मंडळी शिवसेना-भाजपमधील मुंबई ते दिल्ली संवाद ठेवण्याचे काम करीत होती. ते दुवे तेवढे आता राहिलेले नाहीत, असे उद्धव यांनी म्हटले.
– याशिवाय उद्धव यांनी जाहिरातबाजी व अरूणाचल आणि उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसमुक्त देश करण्याचा मार्ग हा नाही. उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये राज्य आणण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्यासाठी शर्थ करा. देश तुम्हाला डोक्यावर घेईल.
– केवळ जाहीरातबाजीवर देश चालत नाही तसेच मोदी सरकार त्यांनी केलेल्या कामांची जाहिरात करीत असेल तर एका मर्यादेत त्यांनी ती करायला काहीच हरकत नाही. लोकांनासुद्धा कळालं पाहिजे की, आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो आहोत.
– मोदींनी इतकी सगळी कामे केली आहेत, त्या कामांतून ठळक पाच कामे काढणे खरेच कठीण असल्याचा टोला यावेळी उद्धव यांनी लगावला.
– सरकारने स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया योजनांची घोषणा केली असली तरी त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे बाकी आहे स्टार्ट अप म्हणजे टेक ऑफ करावेच लागेल असे उद्धव यांनी सांगितले.
– बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता अजूनपर्यंत देशाला लाभलेला नाही. शत-प्रतिशत वगैरे माहित नाही पण राज्यात शिवसेना स्वबळावर झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी आजच्या मुलाखतीत म्हटले आहे.
– निवडणुका तर आम्ही आता लढणारच आहोत. बिहारात लढलो. उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना एका मजबुतीने उतरली आहे. देशाच्या राजकारणावर शिवसेनेच्या विचारांचा प्रभाव हा आहेच. त्याला एक राजकीय आकार देण्याचे काम सुरु आहे.
– पंतप्रधान मोदी जे बोलले ते योग्यच आहे. बुरहान वाणी हा अतिरेकी होता, त्याला हिरो बनवू नका. मी त्यांच्या मताशी
– ‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, या शब्दात मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.