मॅच समरी-
भारत पहिला डाव- 566/8 घोषित
वेस्ट इंडिज पहिला डाव- सर्वबाद 243. भारताला 323 धावांची आघाडी
वेस्ट इंडिज (फॉलोऑन) दुसरा डाव- सर्वबाद 231
निकाल- भारताचा 1 डाव आणि 92 धावांनी विजय
भारतासाठी या बाबी राहिल्या खास-
1# सर्वात मोठा विजय
– भारताच्या 84 वर्षाच्या कसोटी इतिहासात आशियाबाहेर हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
– याआधी भारताने आशियाबाहेर सर्वात मोठा विजय 2005 साली झिम्बाब्वे दौ-यात मिळवला होता.
– तेव्हा भारताने झिम्बाब्वेला एक डाव आणि 90 धावांनी हरविले होते.
2# वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच डावाने विजय
– भारताने वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच डावाने विजय मिळवला आहे.
– भारताने याआधी कधीही वेस्ट इंडिजला त्यांच्या देशात एका डावाने हरविले नव्हते.
3# अश्विनचा कारनामा-
(a) शतक आणि सात विकेट घेणारा जगातील तिसरा खेळाडू
– इंडिजच्या पहिल्या डावात एकही विकेट न मिळालेल्या अश्विनने दुस-या डावात कमाल केली.
– पहिल्या डावात शतक (113) ठोकल्यानंतर व वेस्ट इंडिजला फॉलोऑन मिळाल्यानंतर अश्विनने दुस-या डावात 25 षटकात 83 धावा देत 7 विकेट काढल्या.
– एकाच कसोटीत शतक ठोकून 7 विकेट काढणारा अश्विन जगातील तिसरा खेळाडू ठरला.
– यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रेगरी यांनी 1921 मध्ये तर इंग्लंडच्या इयान बॉथमने 1978 आणि 1980 असे दोन वेळा असा पराक्रम केला होता.
(b) करिअरमध्ये दोनदा शतकासह 5 विकेट घेणारा पहिला भारतीय
– आशिया बाहेर अश्विनची कसोटी करिअरमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी राहिली.
– अश्विनने आपल्या करिअरमध्ये दूस-यादा शतक आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. असा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
– याआधी विनू मांकड आणि पाली उम्रीगर यांनी असा प्रत्येकी एकदा कारनामा केला आहे.
– याआधी 2011 मध्ये अश्विनने इंडिजविरोधातच मुंबई कसोटीत 103 धावा ठोकल्या होत्या तसेच 5 विकेट घेतल्या होत्या.
– अश्विनने या कसोटीत शतक ठोकून इंडिजविरोधात करिअरमध्ये तीन शतक ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली.
4# विराटसाठी आठवली जाईल ही कसोटी-
– या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या करिअरमधील पहिले द्विशतक (200 धावा) ठोकल्या.
– भारताच्या 84 वर्षाच्या कसोटी इतिहासात परदेशी भूमीवर असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला.
– ही फर्स्ट क्लास ते वनडे इंटरनॅशनल अथवा कसोटी फॉर्मेटमधील कोहलीच्या करिअरमधील पहिले द्विशतक आहे.
– 200+ अधिक करणारा भारताचा तो 5th कसोटी कर्णधार बनला. याआधी नवाब पटौदी, गावसकर, सचिन आणि धोनी असा कारनामा केला आहे.
– 26 वर्षापूर्वी 1990 मध्ये अजहरने एक कर्णधार म्हणून परदेशात 192 धावा केल्या होत्या.
– 19 वर्षापूर्वी 1997 मध्ये सचिनने दक्षिण अफ्रिकेविरोधात 169 धावा केल्या होत्या.
5# एका वर्षात कोहलीच्या नेतृत्त्वाखाली विजयाचा विक्रम
– ऑगस्ट 2015 ते जुलै 2016 या दरम्यान भारताने कोहलीच्या नेतृत्त्वाखाली 7 कसोटी खेळल्या.
– यात 7 पैकी भारताने 6 कसोटी सामने जिंकले आहेत.
6# 14 वर्षापासून भारत इंडिजमध्ये नाही हारला-
– भारत मागील 14 वर्षापासून वेस्ट इंडिजविरूद्ध एकदाही हारलेला नाही. यादरम्यान भारताने 16 कसोटी सामने इंडिजविरोधात खेळले आहेत.
– भारत 2002 मध्ये इंडिजविरोधात शेवटचा हारला होता. तेव्हा वेस्टइंडिजने टीम इंडियाला किंगस्टन कसोटीत 155 धावांनी हरविले होते.
– भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 30 कसोट्या इंडिजने जिंकल्या आहेत तर 44 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. भारताने 16 कसोटी सामने जिंकले आहेत.
– भारतने अॅंटीगुआ कसोटी जिंकून 17 वा विजय मिळवला आहे.
7# दुस-यांदा जिंकली पहिली कसोटी-
– आतापर्यंत भारतीय संघ परदेशी दौ-यावर गेल्यानंतर तेथील वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेळ घ्यायचा. त्यानंतर भारतीय खेळाडू ब-यापैकी कामगिरी करीत.
– त्यामुळे पहिल्या-दुस-या कसोटीत भारताला फारसे यश मिळायचे नाही. आता मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. भारताने पहिल्याच कसोटी विजय मिळवला आहे. भारताने असा कारनामा इंडिजमध्येच दुस-यांदा केला आहे.
– याआधी 2011 मध्ये भारतीय संघाने किंगस्टनमधील पहिली कसोटी जिंकली होती.